बायकोच्या प्रेमात त्याने बनविले चक्क विमानसारखे दिसणारे घर…!

नमस्कार मित्रांनो चांदा टू बांदा या साइट च्या माध्यमातून रोज नव नवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहचवत असतो. नियमित नव नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या साइटला भेट द्या. व आमच्या फेसबूक पेजला लाइक करा.
Facebook:-  https://www.facebook.com/Chanda_To_Banda-102685424601666/
Instagram:-  https://t.me/chandatobanda

प्रेमात लोक काय करणार याचा अंदाज येणे काही शक्य नाही. पूर्वी शहाजानने आपली पत्नी मुमताज साथी ताजमहाल बनविले ज्याला आता प्रेमाची निशाणी म्हणून ओळखले जाते. लैला मजनू ची प्रेमकहाणी तर सर्वांनाच माहिती आहे. आपल्या प्रेमासाठी काहीपण करण्याची तयारी पूर्वी पासूनच दिसून येते. आता त्याच्यात पुन्हा एक भर पडली असून एका नवर्या ने आपल्या बायकोसाठी विमानसारखे दिसणारे आलीशान घर बांधून गिफ्ट दिले आहे.
                                       
 नायजेरियाची राजधानी अबुजा येथील राहणारा जमाल याने आपल्या पत्नीसाठी विमानासारखे दिसणारे घर बांधले आहे. जमाल याच्या पत्नीला सतत फिरायला जाण्याची हौस होती. त्यामुळे ती सतत फिरत असायची त्यामुळे तिला सतत फिरत आहे याचा अनुभव येण्यासाठी जमालने विमानसारखे दिसणारे आलीशान घर बांधून दिले. हे घर एखाद्या स्वप्नातील घरासारखे सुंदर आहे. त्यामध्ये गेस्ट हाऊस , स्विमिंग पूल, गार्डन, इत्यादी आहे. हे घर बांधण्यासाठी जमालला २० वर्ष लागले असून त्याने या घराचे काम १९९९ मध्ये चालू केले होते. हे घर पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण लोकांचे आकर्षण या घराकडे लागले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *