मराठमोळे देशाचे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या बद्दल तुम्हाला ह्या गोष्टी माहीत आहे का ?

नमस्कार मित्रांनो चांदा टू बांदा या साइट च्या माध्यमातून रोज नाव नवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहचवत असतो. नियमित नव नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या साइटला भेट द्या.

काही दिवसांपूर्वी लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी  भारतीय सैन्याचे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. महाराष्ट्रासाठी  हा अभिमानास्पद क्षण असून त्यांच्या रूपाने मराठी माणूस भारताच्या सर्व्वोच पदी विराजमान झाला आहे. लेफ्टनंट जनरल नरवणे यांनी ३७ वर्ष सेवा बजावली असून, विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. मनोज नरवणे हे देशाचे २८वे लष्करप्रमुख ठरले आहे. भारतीय लष्करात खूप मोठा फौजफाटा असून जगातील बलाढ्य लष्करामध्ये भारताचा समावेश होतो. लेफ्टनंट जनरल नरवणे १९८० मध्ये त्यांनी शीख लाइट इन्फेट्रीच्या ७व्या बटालियन मधून  कारागिर्दीला सुरवात केली. जम्मू कश्मीर मधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी असलेल्या राष्ट्रीय रायफलचे त्यांनी नेतृत्व केले, त्याचबरोबर त्यांनी युद्ध, शांतताकालीन आणि दहशतवादी अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. त्यांनी प्रत्येक ठिकाणी व प्रत्येक वेळी आपले कौशल्य सिद्ध केले.
लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांना मिळालेली पदके

परमविशिष्ट सेवा पदक,अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक , विशिष्टसेना पदक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *