शेतकर्‍यांच्या पिकावर पुन्हा अवकाळी पावसाचे सावट….!

नमस्कार मित्रांनो चांदा टू बांदा या साइट च्या माध्यमातून रोज नाव नवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहचवत असतो अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला फालो करा.

यंदाचे वर्ष हे शेतकर्‍यांसाठी खूप अडचणीचे ठरत आहे. बुधवारी रात्री व गुरुवारी पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे.विदर्भातील कापूस उत्पादक शेतकर्‍याकडे कापूस वेचणीचे काम चालू असून शेतकर्‍यांना पहिलेच मजुरांच्या समस्येला समोर जावे लागत आहे कापूस वेचनीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे हातात आलेले पीक वाया जाऊ नये म्हणून शेतकर्‍यांची धडपड चालू आहे. सध्या असलेल्या सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकावर परिणाम होत आहे.
या वर्षी अतिवृष्टी ने सुरवातीला शेतकर्‍यांच्या पिकाला संपूर्ण पाण्याखाली नेले व शेतकर्‍यांवर अस्मानी संकट निर्माण केले.अतिवृष्टी मुळे संपूर्ण महाराष्ट्रात झालेला हाहाकार आपण सर्वांनीच पहिला आहे. त्यानंतर कसाबसा उभा होत नाही तोच आता अवकाळी पावसाने पुन्हा शेतकर्‍याच्या मालाला फटका बसला आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा त्रस्त झाला  असून त्यांच्या समोर पुन्हा मोठी समस्या निर्माण झाली आहे. वारंवार येणार्‍या नैसर्गिक संकटामुळे शेतकर्‍यांची अधोगती होत असून दिवसे न दिवस शेतकर्‍यांवरील कर्जाचा बोजा वाढत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *