सावधान…! तुम्ही ब्लुटुथ आणि वायरलेस हेडफोन वापरत असाल तर नक्की वाचा.

सध्या ब्लुटुथ आणि वायरलेस हेडफोन वापराचे प्रमाण खूप वाढत आहे सध्या वायरलेस डिवाईस चा ट्रेण्ड खूप जोरात चालत आहे. स्मार्टफोन , स्मार्टवाच या डिवाईस ला ब्लुटुथ सपोर्ट करत असल्याने त्याचा वापराचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. बाजारात या हेडफोनची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आणि ह्या हेडफोनच्या वापरामुळे लोकांना निरनिराळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.खूप लोकांना हेडफोन च्या वापरामुळे बाहेरच्या गोष्टी कमी ऐकायला येत असल्याच्या समस्या तसेच कान दुखण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हेडफोन मुळे कानाच्या नसांवर दबाव पडल्यामुळे त्याचे कार्य सुरळीत चालत नाही. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण कानाच्या दुखण्याचे रूपांतर डोकेदुखीत होत जाते.  सध्या कानाचा दबाव मोजण्याचे कोणतेही यंत्र उपलब्ध नाही आहे त्यामुळे हेडफोन मुळे होणारे परिणाम आपल्याला लक्षात येत नाही. काही कंपन्यांनी ग्राहकांच्या सोयीनुसार वापरण्यासाठी हेडफोनची निर्मिती केली आहे परंतु अशा प्रकारचे साधने वापरणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे ग्राहकांनी या सर्व डिवाईस चा वापर करतांना काळजी घेणे गरजेचे आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *