सोयाबीन ने ओलांडला हमीभाव, ४४०० रुपये प्रती क्विंटल

सोयाबीन च्या भावात वाढ झाली असून प्रती क्विंटल ४४०० रुपये इतका भाव सध्या शेतकर्‍यांना मिळत आहे. हा भाव सर्वच शेतकर्‍यांना मिळाला नसला तरी पुढील काही दिवसात भाव वाढीचे संकेत मिळत आहे. सोयाबीन ची आवक कमी झाल्यामुळे सोयाबीनच्या मागणीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसाणीमुळे सोयाबीनच्या उत्पादनात  प्रचंड घट झाल्याचे दिसून येते. त्यामुळे सोयाबीनच्या भावात वाढ झाली आहे. वर्धेतील सेलू बाजार समितीत ४४०० प्रती क्विंटल हा भाव शेतकर्‍याच्या मालाला मिळाला आहे. हा भाव यंदाच्या हंगामातील सर्वोच्च भाव मानला जात आहे. मात्र बहुतेक शेतकर्‍यांनी आपली आर्थिक गरज भागविण्याकरिता पहिलेच सोयाबीनची विक्री केल्यामुळे भाव वाढीचा फायदा त्यांना मिळाला नाही. शेतकर्‍यांचा माल विकल्यानंतरच भाव वाढतो व व्यापार्‍यांचाच फायदा होत असल्याची भावना शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *