३ मे पर्यंत संपूर्ण भारत लॉकडाउन. : पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन चालू होते. लॉकडाउनच्या शेवटच्या दिवशी ल्पंत्प्रधन नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन वाढविण्याची घोषणा केली आहे. देशातील लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. देशातील अनेक राज्यांनी लॉकडाउन वाढविण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आज सकाळी १० वाजता देशाला संबोधितांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की ‘तुम्हा सर्वांच्या त्यागामुळेच भारत आतापर्यंत कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यात यशस्वी झाला. त्यामुळेच कोरोनाविरोधात भारताची कोरोनाशी लढाई मजबूत आहे. एखाद्या सैनिकाप्रमाणे प्रत्येकजण आपलं कर्तव्य पार पाडत आहे. एवढचं नाहीतर प्रत्येकाने शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या कर्तव्याचं पालन केलं आहे’. मोदी पुढे बोलताना म्हणाले की, ‘कोरोनाचं वैश्विक संकट आहे त्यामध्ये कोणत्याही देशाशी तुलना करणं योग्य नाही. पण जर जगभरातील मोठ्या देशांतील कोरोनाचे आकडे पाहिले तर त्यांच्या तुलनेत भारत फार चांगल्या परिस्थितीत आहे.

महिन्या भरापूर्वी अनेक देश कोरोनाच्या आकड्यांमध्ये भारतासोबत होते. पण आता त्या देशांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे. भारताने जर वेळीच कठोर निर्णय घेतले नसते तर आज भारताची परिस्थिती काय असती, याची कल्पनाही करवत नाही. सोशल डिस्टंन्सिंग आणि लॉकडाऊनचा फार मोठा फायदा देशाला झाला आहे. आर्थिकरित्या पाहिलं तर देशाला मोठी किमत चुकवावी लागली आहे. पण भारतीयांच्या तुलनेत ती किंमत काहीच नाही.’ भारतात करोनाच्या विरोधात आता लढाई कशी करायची, विजयी कसं व्हायचं, नुकसान कमी कसं होईल, लोकांचे हाल कमी कसे होतील यावर राज्यांबरोबर चर्चा होत आहे. सगळेजण हाच पर्याय देतात की लॉकडाउन वाढवायला हवा. अनेक राज्यांनी लॉकडाउन आधीच वाढवला आहे.’

महत्वाची बातमी..! ग्राहकांनी वीजबिलासाठी स्वत: मिटरचे रीडिंग घेऊन पाठवावे.

आमच्या व्हाट्स एप ग्रुप वर सामील होण्यासाठी येथे क्लिक करा → click here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *