२० लाख कोटींपैकी माझा हिस्याला किती? गूगल वर नवा ट्रेण्ड.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला कोरोनाच्या संकटातून काढण्यासाठी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले.  आर्थिक सुधारणेचा वेग वाढवा, देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी पंतप्रधान मोदी यांनी देशासाठी पॅकेज जाहीर केले. मात्र लोकांवर याचा वेगळाच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सध्या देशातील लोकं 20 lakh crore divided by 130 crore’ म्हणजेच ‘२० लाख कोटी भागीले १३० कोटी’ या संदर्भातील सर्च वाढल्याचे चित्र गुगल ट्रेण्ड्सवरुन दिसत आहे.

थोडक्यात सांगायचे झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या पॅकेज मध्ये प्रत्येकाच्या हीस्याला किती पैसे येणार. या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य आघाडीत असून गुजरात मधील लोकांनी सर्वात जास्त वेळा सर्च केल्याचे समोर आले आहे. या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केल्यानंतर त्यांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेमुळे आत्मनिर्भर म्हणजे काय ? हा ट्रेण्ड पाहायला मिळाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *