२० कोटी महिलांना आज पासून मिळणार मोदी सरकार कडून पैसा थेट खात्यात होणार जमा.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचे लॉकडाउन घोषित केले आहे. त्यामुळे देशातील संपूर्ण उद्योग ठप्प आहे. त्यामुळे कामगार तसेच हातावर पोट असणार्‍या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून गरीब महिलांच्या खात्यात दर महिन्याला ५०० रुपये जमा केले जाणार आहे. यात काही गोंधळ होऊ नये म्हणून सरकार तर्फे पूर्ण काळजी घेण्यात येणार आहे.

कसे होईल खात्यात पैसे जमा 

१ – ज्यांच्या खाते क्रमांकाच्या शेवटी ० किंवा १ हा अंक असेल तर त्यांचे पैसे ३ एप्रिलला होतील.
२- ज्यांच्या खाते क्रमांकाच्या शेवटी २ किंवा ३  हा अंक असेल तर त्यांचे पैसे ४ एप्रिलला होतील.
३- ज्यांच्या खाते क्रमांकाच्या शेवटी ४ किंवा ५ हा अंक असेल तर त्यांचे पैसे ७ एप्रिलला होतील.
४ – ज्यांच्या खाते क्रमांकाच्या शेवटी ६ किंवा ७ हा अंक असेल तर त्यांचे पैसे ८ एप्रिलला होतील.
५- ज्यांच्या खाते क्रमांकाच्या शेवटी ८ किंवा ९  हा अंक असेल तर त्यांचे पैसे ९ एप्रिलला होतील.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बँकांनी सोशल डिस्टन्सिंग कडे लक्ष दिल आहे .

कोरोनावर मात करण्यासाठी वर्ल्ड बँक कडून भारताला मिळणार सर्वाधिक निधि.

One Comment on “२० कोटी महिलांना आज पासून मिळणार मोदी सरकार कडून पैसा थेट खात्यात होणार जमा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *