१ जून पासून धावणार रोज २०० रेल्वे गाड्या, रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी घोषणा.

देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. आता मात्र हळूहळू शासनाकडून काही वाहतूक चालू करण्यात येत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी रोज २०० नॉन एसी गाड्या १ जूनपासून धावणार असल्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात जे बाहेर अडकले आहे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

येत्या १ जूनपासून सुरु होणाऱ्या या ट्रेनसाठी ऑनलाईन बुकिंग लवकरच सुरू होणार आहे. या ट्रेन वेळापत्रकानुसार चालवल्या जाणार आहेत, याबाबतचीही माहिती लवकरच दिली जाईल, असं पियुष गोयल यांनी सांगितलं. जवळच्या मोठ्या रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी कामगारांना मदत करावी. कामगारांचं रजिस्ट्रेशन करुन त्याची यादी रेल्वेला द्यावी, असं आवाहन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राज्य सरकारांना केलं आहे.

तसेच जे मजुर स्थलांतर करत आहे त्यांना केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी तुम्ही जिथे आहे तिथेच थांबण्याची आव्हान केले आहे तुम्हाला तुमच्या गावापर्यंत सरकार पोहोचविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत १६०० ट्रेनच्या माध्यमातून २१.५ लाख मजुरांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचवण्यात आलं आहे, अशी माहिती रेल्वेने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *