होळी कशी साजरी करावी… याबद्दल समाजकार्य महाविद्यालय पडोली च्या विद्यार्थ्यांनी दिला संदेश…

सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित स्व.सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली,चंद्रपूर या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील साकुरे व एम. एस. डब्ल्यू प्रथम वर्षाच्या क्षेत्रकार्य समन्वयिका प्रा. डॉ.प्रगती नरखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रकार्य अंतर्गत मातानगर भिवापुर वॉर्ड येथे नैसर्गिक होळी कशी साजरी करायची व नैसर्गिकरीत्या रंग कसे तयार करायचे यासंदर्भात मार्गदर्शनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. होळी ही पर्यावरण दूषित करण्यासाठी नाही तर आनंद व्दिगुणित करण्यासाठी साजरी केली जाते. व रासायनिक होळी न खेळता या वर्षी नैसर्गिक होळी खेळूया हा सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचावा या उद्देश्य ठेऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..
 कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा. आकरे मॅडम नगरसेविका भिवापूर वार्ड क्र. १४  या प्रामुख्याने उपस्थित होत्या..
तसेच मुख्य मार्गदर्शक म्हणून एम. एस. डब्ल्यू प्रथम वर्षाचे विद्यार्थी मोहन चुकाबोटलावर,दीक्षित शेंडे व अक्षय टेकाम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले..
 कार्यक्रमाचे संचालन सोमेश्वर पेंदाम या विद्यार्थ्यांनी केले. प्रास्ताविक प्रशिक शेंडे तर आभार प्रदर्शन पूजा काळमेंगे या विद्यार्थिनीने केले.

महाविकास आघाडीच्या पहिल्या अर्थसंकल्पातील संपूर्ण तरतुदी व संपूर्ण मुद्दे थोडक्यात.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक , ट्विटर  टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *