हे दुःख बळीराजाचे, मनोगत एका शेतकरी पुत्राचे. .

हे दुःख बळीराजाचे
                 

जगभरात मृत्यूचा थैमान घालणाऱ्या कोरोना ब्लॉग डाऊन संचार बंदीच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त होत आहे आणि दुसरीकडे कोरोना ब्लॉक डाउन मुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन कापूस चना तूर आणि असा अनेक  शेतीत पीकणारा  माल आजही शेतकऱ्यांनी आपल्या घरात उत्पादन खर्चावरील भाववाढीच्या अपेक्षेने भरून ठेवला आहे.
कापूस हे नाशवंत लवकर खराब होणारे वान असून जास्त दिवस घरात कोंबून ठेवल्यास तो पिवळसर येऊन खराब होतो. आणि बाजारपेठेत तो कापूस कवडीमोल भावात खरेदी केला जातो आणि शेतकऱ्याला नफ्या ऐवजी तोटाच सहन करावा लागणार आहे.

कृषिमंत्री साहेब जागे व्हा..

कोरोना ब्लॉक डाउन मुळे बाजारपेठ बंद राहिल्या तर शेतकऱ्यांचा माल घरातल्या घरात सडून खराब होईल त्या शेतमालाला कवडी मोल भावात खरेदी केला जाईल आणि शेतकरी पुन्हा मरणाच्या वाटेवर उभा राहील. प्रशासनाच्या सर्व घोषणा 30 जून पर्यंत च्या आखत असून तोपर्यंत बाजारपेठा बंद राहील असा अंदाज यावरून काढता येईल. जर 30 जून पर्यंत बाजारपेठ बंद राहिल्यास शेतकऱ्यांनी घरात ठेवलेला शेतमाल पूर्ण खराब होईल.आणि आर्थिक संकटात पुढचा शेतीचा हंगाम आणि बी-बियानासाठी शेठ-श्यावकाराकडे कर्जासाठी शेतकऱ्यांना उंबरठे झिजवावे लागतील. यासाठी महाराष्ट्र कृषी मंत्र्यांनी योग्य उपयुक्त योजना तयार करायला पाहिजे परंतु महाराष्ट्र कृषी मंत्र्याच्या कुठल्याही योजना आराखडा दिसत नाही हे आमचं दुर्दैव म्हणायचं काय…..  ?    हे आर्थिक संकट शेतकऱ्यावर येणार नाही यासाठी जिल्हाधिकारी महोदय यांनीही या मुद्द्यावर एक नजर टाकायला हवी. काही दिवसांसाठी योग्य   नियोजन करून काही बाजारपेठा उघडून तिथे गर्दी होणार नाही यासाठी उपाययोजना करून हे शेतकर्यां वरील आर्थिक संकट दूर करता येऊ शकते…..

( योग्य प्लॅनिंग करून  प्रत्येक गावातून फक्त ४ते५ शेतमालाच्या गाड्या बाजारपेठेत पाठवण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत मान्यता पत्र दिल्यास तिथे कसलीही गर्दी होणार नाही आणि  प्रशासनाला बाजारपेठेवर नियंत्रणही ठेवता येईल. अश्या अनेक उपायोजना करता येईल)
यावर आपण सर्वांनी नक्की विचार करावा.

एक शेतकरी पुत्र….

               ✍ चंदु झुरमुरे
                  8788377424

One Comment on “हे दुःख बळीराजाचे, मनोगत एका शेतकरी पुत्राचे. .”

  1. धन्यवाद….माझा हा लेख मुख्यमंत्री साहेबा पर्यंत अवश्य पोहोचवावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *