हातावर पोट असणाऱ्या कामगारांसाठी धावला सलमान खान.

देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लॉकडाऊन घोषित आल्याने अनेक मजुरांचे हाल झाले आहे ज्यांचे हातावर पोट आहे. अशांची तर परिस्थिती गंभीर आहे. अशाच हातावर पोट असणाऱ्या कामगारांसाठी सलमान खान धाऊन आला आहे. त्याने ज्यांचे पोट हातावर आहे अशांसाठी बिईंग हंग्री फूड ट्रक चालू केला आहे. त्याचा या कार्यासाठी अनेकांनी ट्विट करून त्याचे कौतुक केले आहे.

सलमान खान हा नेहमी अनेकांना मदत करत असतो त्यामुळेच त्याची मोठी फॅन फालोइंग आहे. जसा तो पडद्यावर हीरो म्हणून काम करतो तसाच तो आपल्या दैनंदिन जीवनात देखील काम करतो. बीइंग ह्युमन या त्याच्या संस्थेमार्फत अनेक रुग्णांवर उपचार देखील करत असतो. आता देशात लॉकडाऊन सुरू असताना तो हँग्री फूड नावाने लोकांना खाण्यापिण्याची व्यवस्था करत आहे. रोज एक हजारपेक्षा जास्त लोकांना तो अन्नधान्य पोहचवत आहे. याआधीही सलमानचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात बैलगाड्यांवरून अन्नधान्य गावातील गरिबांपर्यंत पोहोचवलं जात असल्याचं पाहण्यात आलं. एवढंच नाही तर सिनेसृष्टीतील अनेक कामगारांनाही त्याने मदत केली. एप्रिल महिन्यात १६ हजार मजूरांच्या अकाउंटमध्ये ४ कोटी ८० लाख रुपये पाठवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *