‘हमी पेक्षा कमी’ भावाने कापूस खरेदी बळीराजा हवालदिल.

सुरवातीला ओल्या दुष्काळामुळे संकटात सापडलेला शेतकरी त्यातून कसाबसा सावरला व आपल्या शेतात कष्ट करून पीक हातात आले आहे, मात्र आता कापूस उत्पादन शेतकर्यांआसमोर पुन्हा मोठे संकट आले आहे कारण कापसाचे भाव कमी होत आहे. यंदा कापसाचा हमी भाव ५५५० एवढा देण्यात आला मात्र खाजगी खरेदी ही पाच हजार पर्यंतच आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
चीनमध्ये आलेल्या कोरोंना वायरस मुळे चीन कडून कापसाच्या गाठीची खरेदी करण्यात आली नाही. त्यामुळे यंदा कापसाच्या कापसाचे उत्पन्न कमी होऊनही कापसाचा भाव वाढला नाही. गेल्यावर्षी कापसाचा भाव शेवटपर्यंत टिकून राहिला यंदा मात्र कापसाचा भाव सुरवातीपासूनच कमी आहे.

सीसीआय खरेदीकडे शेतकर्‍यांचा  कल.

या वर्षी सीसीआय कडे शेतकर्‍यांचा  कल जास्त प्रमाणात दिसून आला आहे . सीसीआयमध्ये कापसला ५५५० पर्यंत भाव मिळत असल्याने  शेतकर्‍यांनी आपला कापूस सीसीआय ला दिला आहे. परंतु सीसीआयला कापूस दिला तर नगदी पैसा मिळत नसल्याने ज्यांना पैशाची आवश्यकता आहे. त्यांनी मात्र कमी भावात खाजगी खरेदीदाराकडे कापूस विकला.

शेअर बाजार कोसळले, गुंतवणूकदारांचे तब्बल साडेपाच लाख कोटीचे नुकसान.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप वर जाईन व्हा.

घडामोडी महाराष्ट्राच्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *