सौरव गांगुलीची अशीही ‘दादागिरी’.

भारताचा माझी कर्णधार व बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली देशात चालू असलेल्या लॉकडाउनमुळे गरीबांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून समोर आला आहे. गांगुलीने आता २० हजार गरजू लोकांना जेवण देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार गांगुली आता २० लोकांना जेवण देण्यासाठी पुढे आला आहे. सध्याच्या घडीला भारतामध्ये २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या परिस्थितीमध्ये आर्थिक दुर्बल घटकांची चिंता वाढली आहे. कारण त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यासाठी गांगुली आता थेट रस्त्यावर उतरला आहे. गांगुलीने यावेळी सुरक्षेचे सर्व उपाय केल्याचे पाहायला मिळाले. तोंडाला मास्क आणि हातामध्ये ग्लोव्ज घालून गांगुली लोकांना मदत करत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

सध्याच्या घडीला भारतामध्ये २१ दिवसांचे लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमध्ये काही लोकं शाळा, महाविद्यालये किंवा अन्य सार्वजनिक स्थळी राहत आहेत. त्याचबरोबर या काळात बऱ्याच जणांना रोजगारही नाही. या गरजू लोकांसाठी गांगुलीने आज दोन हजार किलो तांदूळ दिले होते. पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी ४९ भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. यामध्ये महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, भारताचा विश्वविजेता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, युवराज सिंग, झहीर खान, पीव्ही सिंधू, विश्वनाथन आनंद, हिमा दास, नीरज चोप्रा, मेरी कोम, विनेश फोगट, मनु भाकर या काही खेळाडूंचा समावेश होता.

हेही वाचा ↓↓

महासत्ता अमेरिकेला हवी भारताची मदत, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध पुरवीण्याची केली विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *