सोनू सूद ठरतोय स्थलांतर करणार्‍यांसाठी मसीहा, १७७ मुलींना केले एयरलिफ्ट.

मजुरांचे पायदळ होणारे स्थलांतर पाहून अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेल्या कामगारांना आपआपल्या घरी जाण्यासाठी मदत करत आहे. हजारो कामगारांसाठी सोनू सूद देवदूत बनून पुढे आला आहे. सोनू सूदच्या या कार्यामुळे सर्वांकडून त्याचे कौतूक केले जात आहे. त्याने आतापर्यंत १० ते १२ हजार मजुरांना घरी पोहचविण्याचे करी केले असून त्याचे हे कार्य अजूनही चालूच आहे.

पुन्हा एकदा त्याने केरळमध्ये अडकलेल्या १७७ मुलींना त्यांच्या घरी सुखरुपरित्या पोहोचवलं आहे. सोनूने केरळमधील या १७७ मुलींना विमानाने त्यांच्या घरी पोहोचविण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे या सर्व मुली एर्नाकुलममधील एका फॅक्ट्रीमध्ये शिवणकाम आणि भरतकाम-विणकामांच काम करतात. या अडकलेल्या मुलींची माहिती भूवनेश्वरमध्ये राहणाऱ्या एका मित्राने सोनूला दिली. त्यानंतर सोनूने यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. या सर्व मुलींना त्यांच्या घरी पोहोचवण्यात मदत केल्याबद्दल मला खूप आनंद होत असल्याची प्रतिक्रिया सोनू सूदने यावेळी दिली. सोनूने या सर्व मुलींना सुखरुप भुवनेश्वरला त्यांच्या घरी पाठवण्यासाठी तात्काळ सरकारकडून भुवनेश्वर आणि कोच्ची विमानतळ काही वेळासाठी सुरु करण्याची परवानगी घेतली. परवानगी मिळताच या मुलींना कोची येथून जाण्यासाठी बंगळूरहून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनूशी संवाद साधला होता. सोनूनेही त्यांना उत्तर देत मदतीचं आश्वासन दिलं. सोनूने केलेल्या या कामगिरीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चित्रपंटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू सूद खर्‍या  आयुष्यात अनेकांसाठी हीरो ठरला आहे. सोनू सूदच्या या कार्याला पाहून एका महिलेने आपल्या मुलाचे नाव सोनू सूद ठेवले आहे. हे देखील तितकेच विशेष आहे. सोनू सूदच्या या कार्याला टीम चांदा टू बांदा चा मनापासून सलाम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *