सेल्फी काढणे बेतले जीवावर, तलावात बुडून दोघांचा मृत्यू.

सध्याचे युग हे सोशल मीडियाचे असून रोज नवनवीन स्टेटस अपडेट करण्यावर तरुण पिढीचा जोर आहे. मग त्यासाठी रोज नवनवीन फोटो सेशन करणे चालू असते. असाच पावसाळ्यात धोक्याच्या ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचा नाद जीवावर बेतला आहे. सेल्फी काढण्याच्या नादात वर्ध्यातील दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तेजस राजू चोपडे आणि हर्षल संजय चौधरी अशी या दोघांची नावे आहे. तर सुदैवाने इतर चार जण बचावले आहेत.

वर्ध्यातील कारंजा तालुक्यातील उमरी परिसरातील 6 जण धावसा हेटी तलावात सेल्फी काढायला गेले होते. सेल्फी काढण्यापूर्वी काही काळ मित्र तलावाशेजारी फिरले आणि फोटो काढायला सुरुवात केली. त्यानंतर तलावात असलेल्या एका विहिरीच्या बाजूला खोल खड्ड्याच्या बाजूला सेल्फी काढत होते. त्याच वेळी त्यातील एकाचा पाय घसरला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या इतर चौघांपैकी आणखी एकजण तलावात पडला. साखळी करून एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात पाचही जण तलावात पडले. त्यांचा मित्रा धावसा (हेटी) हर्षल धनराज कालभुत हा बाहेर काही अंतरावर उभा होता. त्याच्या हे लक्षात येताच त्याने मित्र बुडत असताना धावत येऊन पाय दिला. यानंतर त्या तिघांना बाहेर काढले. मात्र इतर दोघांना वाचवण्यात अपयश आले.

आषाढी पौर्णिमेच्या दिवशी घटना घडल्याने दोन्ही गावात शोककळा पसरली आहे. ही घटना घडताच पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहचली.

One Comment on “सेल्फी काढणे बेतले जीवावर, तलावात बुडून दोघांचा मृत्यू.”

  1. पिकनिकला जाणाऱ्यांनी काळजी घेत नाही अश्या घटना पावसाळ्यात जास्त घङतात…आणी मृत्यु क्षमा करत नाही…कुटुंबिय घरी वाट बघत असतात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *