सिक्किममध्ये भारतीय आणि चिनी सैनिक एकमेकांसोबत भिडले.

सिक्कीम मध्ये भारतीय आणि चिनी सैनिक एकमेकांसोबत भिडले असून यामध्ये काही सैनिक जखमी देखील झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उत्तरी सिक्कीम मधील नाकु भागात दोन्ही देशांचे सैनिक एकमेकासोबत भिडले यामुळे काही काळ सीमेवर तणाव निर्माण झाला होता. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये काही बाचबाचीही झाली. परंतु स्थानिक पातळीवरील यंत्रणांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद संपला. परंतु चिनी सैनिकांचा असा उद्दामपणा यापूर्वीही समोर आला होता. 

सिक्कीममध्ये अनेकदा दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये अशाप्रकारचे वाद पाहायला मिळतात. परंतु ज्यावेळी असे वाद होतात त्यावेळी ठरवण्यात आलेल्या प्रोटोकॉलनुसार दोन्ही देशांचं सैन्य आपापसात अशा समस्यांचं निराकरण करतात, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. यापूर्वी २०१७ मध्ये दोन्ही देशांदरम्यान तणावाचे वातावरण पाहायला मिळाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *