सार्वजनिक बँकांमध्ये तब्बल १.१७ लाख कोटी रूपयांचा गैरव्यवहार उघड

सर्वसामान्य माणूस आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आपले पैसे बॅंकमध्ये ठेवतो. परंतु आता त्याच बॅंकमध्ये चालू वर्षात तब्बल १.१७ लाख कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याची बाब उघड झाली आहे त्यामुळे लोकांसमोर आता आपले पैसे कुठे सुरक्षित ठेवायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे . चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात एप्रिल ते डिसेंबर २०१९ या कालावधी दरम्यान सार्वजनिक क्ष्रेत्रातील १८ बॅंकमध्ये मिळून १.१७ लाख कोटी रुपयांची तब्बल ८९२६ गैरव्यवहाराची प्रकरणे समोर आली आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते चन्द्रशेखर गौड यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरावर ही माहिती उजेडात आली आहे. या गैरव्यवहारमध्ये स्टेट बँक सर्वात समोर असल्याचे दिसून येते. एकूण गैरव्यवहार झालेल्या रकमे पैकी २६ टक्के रक्कम ही स्टेट बँक मधील आहे. या गैरव्यवहारामध्ये पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा , अलाहबाद बँक , बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन ओवरसीज बँक, कॅनरा बँक, युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सिंडीकेट बँक, कोर्पोरशन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आंध्र बँक, अशा अनेक बँकेचे नाव समोर आले आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *