सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी. वाचा गणेशोत्सव कसा साजरा करायचा.

कोरोनामुळे राज्याची स्थिति गंभीर आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यंदाचा गणेशोत्सव सध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय सर्व गणेश मंडळ व राज्य सरकारने घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारकडून गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे.

  • सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांना महापालिका अथवा स्थानिक प्रशासनाची त्यांच्या नियोजित धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. 
  • कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा. न्यायालयाने निर्गमन केलेले आदेश व स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण याच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावे. 
  • श्रीगणेशाची मूर्ति सार्वजनिक मंडळाकरिता ४ फुट तर घरघुती गणपती २ फुट असावा.
  • शक्यतो यावर्षी पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू व संगमवर आदि मूर्तीचे पूजन करावे. 
  •  गणेशोत्सवासाठी वर्गणी स्वेछेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा. 
  • सांस्कृतिक कार्यक्रमांपेक्षा आरोग्य विषयक उपक्रमे राबवावी. उदा. रक्तदान शिबीर इत्यादि. 
  • सामाजिक संदेश व आरोग्य विषयक जाहिराती ( देखावे ) लावण्यास पसंती द्यावी. 
  • सार्वजनिक गणपतीची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *