सरकारला कर प्राप्त होण्यासाठी वाइन शॉप सुरू करा, राज ठाकरे यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

कोरोनामुळे राज्याची तिजोरी खाली झाली आहे त्यामुळे आता राज्याच्या तिजोरी भरण्यासाठी काही तरी पाऊल उचलावे लागतील यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी राज्यात वाइन शॉप चालू करावी अशी मागणी केली आहे. कारण राज्याचा महसूल हा सध्याच्या कोरोनाच्या महामारीमुळे थांबला आहे. त्यामुळे आता महसूल चालू करण्यासाठी राज्याने काहीतरी प्रयत्न करायला हवेत राज्याला एका दिवसात ४३ कोटी रुपये महसूल या माध्यमातून प्राप्त होतो याचा विचार केला तर महिन्याला १२५० कोटी तर वर्षाला १५००० कोटी रुपयांचा महसूल राज्याला वाइन शॉपच्या माध्यमातून प्राप्त होतो. त्यामुळे दारू पिणाऱ्यांसाठी नाही तर राज्याच्या महसुलासाठी वाइन शॉप चालू करण्यात यावे अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

राज्याला वाइन शॉपच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलातून कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी आरोग्य सेवा किंवा मेडिकल च्या बाबतीतील काही उपाय योजनांवर हा पैसा वापरता येईल. त्याच प्रमाणे राज ठाकरे यांनी पुन्हा एक मुद्दा या पत्रात नमूद केला आहे तो म्हणजे मुंबई मध्ये पार्सल सेवा चालू करण्यात यावी कारण मुंबई मधील बहुसंख्य मजूर वर्ग हे राईस प्लेट घेऊन आपली भूक भागवत असतात. त्यामुळे ती राईस प्लेट चालू करणे महत्वाचे आहे कारण कोरोना विरूद्ध लढायचे असेल तर प्रतिकार शक्ती वाढविणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत मुंबईतील मजूर वर्ग त्यांना पुरेसे अन्न मिळत नसल्यामुळे उपाशी आहे त्यामुळे पार्सल सेवा चालू केल्याने त्यांना चांगले जेवण मिळेल व त्यांची कोरोना विरूद्ध लढण्याची शक्ती वाढेल. असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *