श्रीपाद छिंदम ला ठाकरे सरकारचा दणका,नगरसेवकपद रद्द.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द काढणार्‍या  श्रीपाद छिंदम ला ठाकरे सरकारने दणका दिला आहे. श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

२०१८ मध्ये फोनवर बोलतांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द काढला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यात छिंदम विरोधात असंतोषाची लाट पसरली होती. त्यामुळे त्यांची भाजपामधून हकालपट्टी करण्यात आली होती व त्याच्या उपमहापौर पदाचा राजीनामा ही घेण्यात आला होता. त्याला अहमदनगर मधून हद्दपार सुद्धा करण्यात आले होते. गेल्या विधानसभा निवळणूकीतही त्याने निवडणूक लढवली होती मात्र त्याचा दारुण पराभव झाला. या निर्णयाचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे. या निर्णयामुळे यापुढे कोणत्याही राजकीय नेत्याचे महापुरुषांबद्दल अपशब्द काढण्याची हिम्मत होणार नाही. अशी चर्चा चालू आहे.

मोठी बातमी…! उद्या होणार शेतकरी कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *