श्याम बोबडे यांची सह्याद्री प्रतिष्ठानच्या चंद्रपूर शहर अध्यक्षपदी निवड

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या चंद्रपूर शहर अध्यक्षपदी श्याम बोबडे यांची निवड करण्यात आली आहे. सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेल्या सुवर्णशिल्पांच्या म्हणजेच गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी उभी केलेली दुर्गसंवर्धन चळवळ हि राज्यातील प्रत्येक गावापर्यंत आणि त्या गावातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी, जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याचे प्रमुख साक्षीदार, सुवर्ण शिल्पे असलेले हे गड-किल्ले जतन करण्याच्या कामासाठी अजून बळकटी मिळेल आणि दुर्गसंवर्धन चळवळीचा, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा म्हणजेच शिवरथ यात्रेचा प्रसार त्या विभागातील जनमाणसापर्यंत पोहोचवता येईल हा या नियुक्तीच्या पाठीमागील मुख्य उद्देश आहे.

श्याम बोबडे यांनी या पहिले सह्याद्री प्रतिष्ठान चंद्रपूरचे शहर उपाध्यक्ष पद भूषविले होते. त्यांनी केलेले कार्य पाहून त्यांना सह्याद्री प्रतिष्ठान चंद्रपूरच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांची ही निवड सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्राचे निलेश जेजुरकर यांच्या मार्फत करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीत गेलेले ‘त्या’ पाच नगरसेवकांनी बांधले शिवबंधन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *