शेतकऱ्यांना दिलासा….! जून ते सप्टेबर महिन्यात मान्सुन बरसणार.

सध्या देशातील परिस्थिती गंभीर असली तरी आता समोरच्या हंगामात दिलासा देणारी बातमी आहे. यंदाच्या  हंगामात मान्सून सामान्य असून जून ते सप्टेंबर महिन्यात ९६ ते १०० टक्के पाऊस पडणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने अंदाज जाहीर केला आहे .

देशातील सामान्यासह शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. मान्सूनचं प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या केरळमध्ये 1 जूनपर्यंत पाऊस वर्दी देईल अशी आशा आहे. तर चेन्नईत 4 जून, पणजीमध्ये 7 जून, हैदराबादमध्ये 8 जून, पुण्यात 10 आणि मुंबईत 11 जूनपर्यंत दाखल होईल अशा अंदाज  आहे. शेतकऱ्यांना दर वर्षी चांगल्या मान्सूनची प्रतीक्षा असते. अशातच हवामान विभागाने मान्सून असा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यंदा पाऊसमान सामान्य राहण्याची शक्यता 21 टक्के आहे तर सामन्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता 20 टक्के आहे. भारतात सामान्यत: जून महिन्याच्या मध्यात मान्सूनची सुरुवात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *