शेतकर्‍याचा नादच खुळा, मुलीची वरात पाठवली ‘हेलिकॉप्टरने’

विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण असतो. लग्न सोहळा चांगला व्हावा यासाठी विविध कल्पना लग्न सोहळ्यात मांडल्या जातात. तसेच आपला लग्न सोहळा भव्य दिव्य व्हावा यासाठी अर्धापूर तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबाने आपल्या लेकीच्या लग्नाची वरात ( पाठवणी ) चक्क हेलिकॉप्टर ने केली, रविवारी कोंढा या गावात हा लग्न सोहळा पार पडला. अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावचे सरपंच असलेल्या रामराव बाबुराव कदम यांची बहीण शिल्पा कदम हिचा विवाह उखळीचे मोहन गायकवाड यांच्याशी संपन्न झाला. बहिणीच्या इच्छेप्रमाणे रामरावांनी तिच्या वरातीवर ( पाठवणीवर ) आठ लाख रुपये खर्च केले. कोंढा गावातून मंगलकार्यालयापर्यंत व नंतर पाठवणी हेलिकॉप्टरने केली.

आम्ही कधी मुलगा मुलगी असा फरक केला नाही मुलीचे स्वप्न साकार करण्याचे ठरविले होते. मी एक शेतकरी असून मुलीची इच्छा पूर्ण केली आमच्या परिसरात उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी आहे त्यामुळे उस हळद यासारखी पिके चांगली येतात त्यामुळे उत्पन्न ही चांगले होते.
– नारायण कदम ( वधूचे वडील )

मला अभिमान आहे की मी शेतकर्या)ची लेक आहे. शेतकरी म्हटलं तर कष्ट आलेच माझे वडील भाऊ यांनी आजपर्यंत मला खूप दिले माझ स्वप्न होत की हेलिकॉप्टर मध्ये बसायचे ते स्वप्न आज साकार झाले

शिल्पा कदम ( नववधू )

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा
येथे क्लिक करा :- घडामोडी महाराष्ट्राच्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *