शेतकर्‍यांना दिलासा…! चंद्रपुर जिल्ह्यातील कापूस खरेदी १८ एप्रिल पासून होणार सुरू.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र लॉकडाउन चालू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खाजगी तसेच सीसीआय कापूस खरेदी बंद आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना अडचणी येत होत्या परंतु आता लवकरच कापूस खरेदी चालू होणार आहे.

कापूस खरेदी चालू करण्यात यावी ही मागणी मागील काही दिवसांपासून होत होती. चंद्रपुर जिल्ह्याचे खासदार बाळू धांनोरकर तसेच इतर लोकप्रतींनिधींनी कापूस खरेदी चालू करण्यात यावी यासाठी शासनाकडे पत्र व्यवहार केले. त्यामुळेच आता कापूस खरेदी चालू होणार आहे. परंतु यामध्ये काही अटी ठेवण्यात आल्या आहे. शेतकर्यांपची कापूस खरेदी केंद्रावर गर्दी होऊ नये व सोशल डिस्टनसिंग चे उल्लंघन होऊ नये याची काळजी घेऊन कापूस खरेदी केंद्र चालू करण्यात येणार आहे.

शेतकर्‍यांना आपला कापूस विकण्यासाठी काय करावे लागणार. 

कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी आपल्या तालुक्यातील बाजारसमितीत कापूस विक्री साठी दिनांक १३ एप्रिल २०२० ते १७ एप्रिल २०२० या कालावधीत संपर्क करून आपली नोंदणी करायची आहे. नोंदणी झाल्यानंतर शेतकर्‍यांना बाजार समिती मार्फत फोन किंवा sms मार्फत कापूस आणण्याबाबत सूचना देण्यात येतील.शेतकर्‍यांनी बाजारसमितीत नोंदनीही फोनवरूनच करावी प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही.सदर कापूस खरेदी ही सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत चालू राहील. १७ एप्रिल पर्यंत नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांचा कापूस खरेदी झाल्यानंतर पुन्हा कापूस खरेदीसाठी नोंदणी चालू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. परंतु एका दिवशी केवस ५ ते १०शेतकर्‍यांचाच कापूस खरेदी करावा असेही आदेश देण्यात आले आहे. शेतकर्‍यांनी कापूस केंद्रावर गर्दी करू नये अशी सूचना देण्यात आली आहे.

कापूस खरेदी करण्याबाबत परवानगीचे  आदेश – click here

ब्रेकिंग न्यूज…! महाराष्ट्रात ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन कायम.

3 Comments on “शेतकर्‍यांना दिलासा…! चंद्रपुर जिल्ह्यातील कापूस खरेदी १८ एप्रिल पासून होणार सुरू.”

  1. अतिशय उत्तम काम होईल. कापूस खरेदी केंद्र चालू होणार म्हणजे शेतकरी आपला गाडा पुन्हा व्यवस्थित चालू करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *