शिष्यवृत्ती महाघोटाळ्याविषयी धक्कादायक खुलासा

समाजकल्यान विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती वाटपात 2010 ते 2017 या कालावधीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.संबंधीत महाविद्यालयांना समाजकल्याण खात्यामार्फत शिष्यवृत्तीची रक्कम वर्ग होऊनही विद्यार्थ्यांना ती मिळत नव्हती.यामुळे तत्कालीन फडणवीस सरकारने या घोटाळ्याच्या चौकीशीसाठी एसआयटीची स्थापना केली. या तपासानंतर हे प्रकरण अखेर ईडीकडे सोपवलं गेलं.ईडीने समाजकल्याण खात्यामार्फत पुणे जिल्ह्यातील सर्व म्हणजेच 1609 शिक्षणसंस्थांना शिष्यवृत्ती वाटपाचे हिशोब सादर करण्याचे आदेश दिले.उत्तर देण्याची मुदत संपूनही तब्बल 780 शिक्षणसंस्थांनी हिशोब सादर न केल्याने याप्रकरणी गैरव्यवहार झाल्याची शक्यता बळावली आहे.

आमदार विनायक मेटे यांनी विधानपरिषदेत पुण्यातील शिष्यवृत्ती महाघोटाळ्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता यावर उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी शैक्षणिक संस्थेत गैरव्यवहार झाल्याची कबुली दिली आहे.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक , ट्विटर  टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *