शिवसैनिकाला पंतप्रधान करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवसेनाच्या वर्धापनदिनी निर्धार

आज शिवसेनेचा ५४वा वर्धापन दिन असून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला होता. कोरोना विषाणुंचा संसर्ग सुरु असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा सामूहिकरित्या साजरा होणार नाही. १९६६ मध्ये स्थापन झालेल्या शिवसेनेने गेल्या ५४ वर्षात महाराष्ट्रासह देशभरात आपला दबदबा निर्माण केला आहे.

आज शिवसेनेच्या वर्धापन दिनी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशावर चीन नावाचं संकट आहे. त्यासाठी संध्याकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक आहे. हिमालयाच्या संकटालासुद्धा महाराष्ट्राचा सह्याद्री लागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आपल्यासोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला तो मोडीत काढत आपण मुख्यमंत्री म्हणून बसलो असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितले. भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही करणार, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर हा शिवसेनेचा पहिला वर्धापन दिन आहे.

भारताकडून चीनला जोरदार झटका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *