शिवसैनिकांच्या मदतीने घरी पोहोचले मजूर गडचांदूर- सिंदेवाही प्रवास झाला सुखकर.

गडचांदूर,

देशात संपूर्ण टाळे बंदी असल्यामुळे अनेक ठिकाणी मजूर स्थलांतर करित असून गावाची पायी वाट चालू केली आहेत.अश्यातच शिंदेवाही येथील काही युवक हैद्राबाद येथे कामासाठी गेले होते. हातातून काम गेल्यामुळे युवकांनी गावाकडे पायदळ प्रवास चालू केला. युवक पायी प्रवास करीत गडचांदूर शहरात पोहोचले. एकदम थकलेल्या स्थितीत असलेल्या मजुरांनी  शिवसेना सिंदेवाही तालुकाप्रमुख देवेंद्र मंडलवार यांचेशी सम्पर्क साधला आणि लगेच देवेंद्र मंडलवार यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख धंनजयभाऊ छाजेड व युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रणितभाऊ अहिरकर यांच्यासोबत फोन वर संपर्क केला. शिवसैनिकांनी क्षणांचा विलंब न करता मजुरांना शोधून गडचांदूर इथे खानपाणाची व्यवस्था केली आणि त्यांना सिंदेवाही पर्यंत पोहचण्यासाठी स्वखर्चातून गाडी करून दिली आणि त्यां सर्व मजुरांना सुखरूप सिंदेवाही पर्यंत पोहचवून दिले.

मजुर स्वगृही पोहोचताच आपल्या गावी पोहचल्यानंतर सर्व शिवसेना गडचांदुर पदाधिकाऱ्यांचे मनातून आभार  मानले. गडचांदूर आणि सिंदेवाही शिवसेना पदाधिकार्यांच्या रुपात आज आम्ही प्रत्यक्षात देव पहिला अशी भावना त्यांनी घरी पोहचल्यानंतर व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *