शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी दोन्ही उमेदवार निश्चित.

राज्यातील घटनात्मक पेचावरून निर्माण झालेल्या वादावर राज्यपाल यांनी तोळगा काढला आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना देखील केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या निवडणुकीला परवानगी दिली. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला. विधान परिषदेची निवडणूक २७ मे पूर्वी घेण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहे. त्यामुळे विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी करणे सुरू झाले आहे.

महाविकासआघाडीचे सध्याचे संख्याबळ पाहता त्यांच्या पाच जागा जिंकतील अशी शक्यता आहे. त्याच पार्श्व भूमीवर शिवसेनेच्या कोट्यात येणाऱ्या दोन्ही जागा जवळपास निश्चित झाल्या आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व निलम गोरे यांना उमेदवारी मिळणार असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

भाजपकडून कोणाच्या गळ्यात पडणार विधान परिषदेची माळ

विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाली असून भाजपाच्या सध्याच्या संख्या बळ पाहता त्यांना तीन जागा जिंकता येईल. भाजपा कडून भाजपा नेते एकनाथ खडसे हे विधान परिषदेसाठी इच्छूक असल्याचे त्यांनी बोलवून दाखविले असून त्यांनी याबाबत केंद्राला कळविले असल्याचे सांगितले आहे. तसेच भाजपा कडून विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे व पंकजा मुंडे यांची देखील नावे समोर येत आहे. त्यामुळे आता भाजपकडून कोणाच्या गळ्यात विधान परिषदेची माळ पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *