‘वेळ पडल्यास भाजपा देणार शिवेसेनेला पाठिंबा’ सुधीर मुनगंटीवार यांचे वक्तव्य.

मुस्लिम आरक्षनाच्या मुद्द्यावरून महाविकासआघाडीत मतभेद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुस्लिम आरक्षणावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेवर दबाव आणत असतील तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून वेळ पडल्यास आम्ही शिवसेनेच्या पाठीशी उभे राहू  असे वक्तव्य राज्याचे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका ही अत्यंत योग्य आहे, यापूर्वी शिवसेना व भाजपा यांच्यामध्ये एका विचारसरणीचा आधार होता त्यामुळे या बाबतीतही आमचा समविचार असल्याने जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी अहो, उद्या चालून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी सरकारचा पाठिंबा काढला तर या मुद्दयासाठी आम्ही सरकारला पाठिंबा देऊ असे मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगीतले.
अल्पसंख्याख मंत्री यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्यात असल्याची घोषणा केली होती मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले त्यामुळे मुस्लिम आरक्षणावरून सरकारमध्ये मतभेद असल्याचे समोर आले होते.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक,ट्विटर  टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *