विनाकारण बाहेर पडणार्‍यांना पोलिसांचा दणका, ४ तासात केल्या तब्बल ३०० गाड्या जप्त.

सध्या देशात कोरोंनाचा प्रादुर्भाव दिवसेनदिवस वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शासनाकडून मोठे प्रयत्न करण्यात येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन देशाचे पंतप्रधान तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले. परंतु जनतेने ते अजूनही गंभीरतेने घेतले नाही. त्यामुळेच आज पोलिसांनी विनाकारण घराबाहेर पडणार्‍यांना चांगलाच दणका दिला आहे.
सांगली शहरातील रस्त्यांवर विनाकारण दुचाकी घेऊन फिरणार्‍यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरवात केली आहे. अवघ्या ४ तासात पोलिसांनी तब्बल ३०० गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहे. कोरोंनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सांगलीकरांना घरपोच किराणा माल व भाजीपाला उपलब्ध करून देण्यात आला तरीही लोक विनाकारण रस्त्यावर फिरतांना दिसून आली त्यामुळे आता पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरवात केली आहे.

महाराष्ट्रासमोर गंभीर आर्थिक संकट, महाराष्ट्राला २५ हजार कोटींच पॅकेज देण्याची केंद्राकडे मागणी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *