विदेशी गुंतणुकीबाबत भारताने उचलले महत्वाचे पाऊल.

शेजारी राष्ट्रांच्या गुंतवणुकी बाबत भारत सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. भारताशी लगत असलेल्या सीमा असलेल्या देशांना भारतात गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्वमंजुरी घेण्याचे सक्तीचे पाऊल भारताने उचलले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील कंपन्यांना सावज करून संधीसाधू ताबा व संपादनाच्या व्यवहारांना आळा बसावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनामुळे देशातील संपूर्ण कंपन्यांना आर्थिक आर्थिक संकटांना समोर जावे लागत आहे. त्यामुळे अशा कंपन्यांमध्ये थेट गुंतवणूक करून त्या कंपन्या चीन सारख्या देशांकडून ताब्यात घेतल्या जाऊ शकतात. चिनी कंपन्यांकडून गैरव्यवहार होऊ नये म्हणून परकीय गुंतवणुकीचे नियम बदलविण्यात आले आहे. गेल्या वर्षी भारताने गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळावे म्हणून थेट गुंतवणूकीचे नियम शिथिल केले होते. आता मात्र केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय गुंतवणूक करता येणार नाही.

कॉंग्रेसचे माझी अध्यक्ष राहुल गांधी यांनी परदेशी गुंतवणुकीसंबंधी प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या या म्हणण्याची सरकारने थेट दखल घेऊन परदेशी गुंतवणुकीचे नियम कठोर केल्याबद्दल राहुल गांधी यांनी सरकारचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *