विदर्भात उन्हाचा पारा चढला. नागपूर ४४.२ अंशावर

गेल्या काही दिवसांपूर्वी झालेले वादळी पावसानंतर आता विदर्भातील तापमानाचा पारा चढला आहे. आजचे नागपुरातील तापमानची ४४.२ अंश सेल्सिअस एवढी  नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांत ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा तडाखा जाणवत नव्हता. यंदा उन्हाळ्याचं फील येत नाही आहे अशी भावना विदर्भात व्यक्त केली जात होती. परंतु मे  महिन्याच्या पहिल्याच आठवळ्यात उन्हाचा पारा चढला असून आज उन्हाचा पारा ४५  अंशाच्या जवळ पोहचला आहे.

आज विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तापमान हे ४० अंशापेक्षा जास्त होते. यामध्ये अकोला ४४.९ , नागपूर ४५.२, ब्रह्मपुरी ४४.१, चंद्रपूर ४३.८, अमरावती ४३.८  तर बुलढाण्यात सर्वात कमी ४१.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *