वाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे.

राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी राज्याच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेतला असून त्यांनी पुढील ठळक मुद्दे मांडले.

  • महाराष्ट्रात 1 लाख 8972 चाचण्या, त्यापैकी 1 लाख 1162 नमुने निगेटिव्ह आले आहेत. यापैकी 7628 इतके जण पॉझिटिव्ह रुग्ण, 323 मृत्यू झाला आहे.
  • करोनावर औषध येण्याधीच आपला देश आत्मविश्वास आणि संयमाच्या बळावर हे युद्ध जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
  • सोशल डिस्टन्सिंग म्हणजे एकमेकांपासून शारीरिक अंतर राखा, मनात अंतर नव्हे
  • लॉकडाऊनमुळे आपण करोनाचा गुणाकार रोखू शकत आहोत लॉकडाऊनचे पालन करणे आवश्यक. 
  • जे संयम पाळताय त्यातच देव आहे. आपल्यासाठी अहोरात्र झटणारे जे कुणी आहेत, त्यांच्यात देव आहे. डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कामगार आणि पोलिसांमध्ये देव आहे त्यामुळे आपल्या सेवेसाठी झटणाऱ्यांचा आदर करणं गरजेचं आहे
  • हल्ली सगळे दिवस सारखे झालेत. हे कोणालाच अपेक्षित नव्हतं. पण ही लढाई आपण लढतोय. आपापले धार्मिक सण, उत्सव बाजूला ठेवून माणुसकीच्या धर्माला प्राधान्य दिल्याबद्दल सर्व धर्मियांचे आभार मानायला हवे.
  • मुस्लीम धर्मियांनी आपले नमाज घरातच अदा करावेत, मस्जिद किंवा रस्त्यावर नमाज पठण करण्यासाठी गर्दी करू नका.
  • भाषणादरम्यान करोना लढ्यात बळी गेलेल्या दोन पोलिसांना श्रद्धांजली वाहिली.
  • मुख्यमंत्र्यांनी यावेळी केंद्रीय मंत्री गडकरींचे आभार मानले. कारण, प्रसारमाध्यमांशी बोलताना गडकरी म्हणाले होते की, मी या परिस्थितीत राजकारण बाजूला ठेवत आहे. केंद्रात आणि राज्यात एकोपा असताना काही जण अजूनही राजकारण करत आहेत.
  • केंद्राचं पथक मुंबईत मुक्कामी आहे. केंद्राच्या पथकाकडे त्रयस्थपणे निरीक्षण करण्याची विनंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *