वाईन शॉप समोर तळीरामांची झुंबड, दारुसाठी लागल्या रांगा.

कोरोनाच्या पार्श्व भूमीवर देशात आजपासून तिसऱ्या लॉकडाऊन ला सुरवात झाली असून तिसऱ्या लॉक डाऊन मध्ये काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. यामध्ये वाईन शाॅप शॉपला कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे तळीरामांनी वाईन शॉप समोर मोठी गर्दी केली आहे.

गेल्या महिनाभरापासून दारुपासून लांब असणाऱ्या तळीरामांनी आज सकाळी सकाळीच दारू घेण्यासाठी मोठी गर्दी केली. काही ठिकाणी दारू घेण्यासाठी गेलेल्या लोकांमुळे वाहतुकीची कोंडी देखील निर्माण झाली असून पोलिसांना तिथे हस्तक्षेप करावा लागला. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं म्हणून लोकांना उभं राहण्यासाठी दुकानाबाहेर ठरावीक अंतरावर गोल रिंगण करण्यात आलं होतं. या रिंगणात उभे राहिलेल्यांनाच दारूच्या बाटल्या दिल्या जात होत्या. अनेक ठिकाणी तर तळीरामांनी स्वत:च सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत दारूच्या बाटल्या विकत घेतल्या.  तर काही ठिकाणी पोलिसांना मध्ये पडावं लागलं आहे. काही ठिकाणी वाईन शॉप धारकांनी उन्हाचा तडाखा पाहून समोर मंडप उभारला आहे. महिन्याभरापासून दारू न पिलेल्या तळीरामांना आता दारू मिळत असल्याने थोडा दिलासा मिळाला असून त्यांनी आपली दारूची तहान भागविण्यासाठी अगदी सकाळपासूनच तयारी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *