लॉकडाउन ! १७ वर्षाच्या मुलीला खांदावर घेऊन बापाने गाठले २६ किमीवरील रुग्णालय.

संपूर्ण देशात लॉकडाउन चालू असून कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून लॉकडाउन चे काटेकोर पालन होत आहे. पोलिसांकडून देखील घराबाहेर न पाडण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे मोलमजुरी करून जीवन जगणार्याा लोकांचे खूप एचएएल होत आहे. एकतर त्यांच्या रोजच्या जेवणाची समस्या आहे. आणि त्यातच त्यांना काही झालेच तर त्यासाठी रुग्णालयात जायला मोठा संघर्ष करावा लागत आहे.

गोवंडीतील झोपडपट्टीत राहणार्या  ६० वर्षीय बापाला आपल्या १७ वर्षाच्या मुलीला खांद्यावर घेऊन २६ किलोमीटर चालत रुग्णालय गाठावे लागले. गुरुवारी मोहम्मद रफी यांच्या मुलीच्या पोटात अचानक खूप दुखायला लागलं. तिला उठताही येत नव्हतं. तिची ही अवस्था पाहून वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. जवळपास डॉक्टर नाही. लॉकडाऊनमुळे गाड्या नाहीत मुलीला काही करून तातडीनं रुग्णालयात नेणं महत्त्वाचं होतं. जास्त विचार न करता वडिलांनी थेट मुलीला खांद्यावर उचलून घेतलं आणि गोवंडी ते परळ असा 26 किलोमीटर चालत आले. त्यांनी मुलीला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. खिश्यात एक रूपायही नसतांना भर उन्हात एवढे अंतर कापून आपल्या मुलीला रुग्णालयात याव लागलं कारण त्या पित्याला आपल्या मुलीला होणार्याा वेदना असह्य झाल्या नाही त्यामुळेच ६० वर्षीय बापाला आपल्या १७ वर्षीय मुलीला खांदावर घेऊन रुग्णालयात जाव लागलं .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *