लॉकडाउन स्पेशल…! घरातील कामांत गुंतले गृहस्थ, तर युवकांनी फेसबूक वर आणलाय जुने फोटो बाहेर काढण्याचा नवीन ट्रेंड.

सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन चालू आहे. कोरोंना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्व नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे घरी राहून कंटाळलेल्या गृहस्थांनी साफसफाईकडे  आपला मोर्चा वळविला आहे. बाहेर जाऊन पोलिसांचा दांडू खाण्यापेक्षा घरी राहून साफसफाई करण्यास नागरिकांनी प्राधान्य दिले आहे. त्याच बरोबर घरमध्ये गृहीणींनी केलेल्या नवनवीन पक्वानांचा आस्वाद घेण्यात व्यस्त आहे.
घरी राहून कंटाळलेल्या युवकांनी सध्या फेसबूक वर एक नवीनच आगळावेगळा ट्रेंड चालू केला आहे. सध्या हे युवक पाच दहा वर्षा पूर्वीचा फेसबूक वरील फोटो काढून त्यावर गंमतशीर कमेंट्स करण्यात व्यस्त आहे. फेसबूक वरील या कमेंट्स वाचल्या तर तर हसून हसून नक्कीच पोट दुखेल. आणि ‘कुणीतरी आवारा रे यांना’ असं म्हणायची वेळ येईल.

सध्या फेसबूकवर करण्यात येणार्‍या गंमतशीर कमेंट्स 

या रूपाला बघून सगळ्या होतात बेभान,
दिसताच म्हणतात आला ग बाई माझा शक्तिमान.

मागच्या आठवळ्यात होता गुडीपाळवा,
भाऊचा फोटो पहायला थोडा ब्राइटनेस वाढवा.

लॉकडाउन मध्ये चालू आहे पेट्रोल पम्प,
भाऊला जावई करणार आहे स्वत: डोनाल्ट ट्रंप.

गावकर्‍यांनी लढवली शक्कल, विनाकारण बाहेर फिरणार्‍यांची काढणार गाढवावर धिंड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *