रेल्वे रुळावर झोपलेल्या १६ मजुरांचा रेल्वेखाली येऊन अंत.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बाहेरगावी काम करणारे मजूर आपल्या गावाला जायला निघाले आहे प्रशासनाने मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी विशेष सोय केली असून काही मजूर त्याची वाट न पाहता पैदल आपल्या गावाकडे जात आहे. मिळेल त्या रस्त्याने जाणे आणि मिळेल त्या ठिकाणी विसावा घेणे असे करत करत अनेक मजूर आपल्या गावीही पोहोचले आहे. परंतु मालवाहू ट्रेनखाली चिरडून 16 मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. रात्रीच्या वेळेस रेल्वे रुळावरच विश्रांती घेण्यासाठी झोपलेल्या मजुरांचा पहाटेच्या सुमारास करुण अंत झाला. औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर करमाड शिवारात एमआयडीसीच्या निर्माणाधीन पुलाजवळ ही दुर्घटना घडली.

लॉकडाऊन मध्ये जालन्यात अडकलेले मजूर औरंगाबादच्या दिशेने पायी येतांना रात्री थकल्याने रेल्वे बंद असल्याने रेल्वे रुळावर आराम करत असताना रेल्वेने त्यांना चिरडले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भूक, पैशांची कमतरता, कोरोनाची भीती आणि कुटुंबाची ओढ अशा विविध कारणांमुळे धीर सुटलेल्या मजुरांनी आधीच आपल्या घरची वाट धरली होती. काही जण हजारो किलोमीटर आणि कित्येक दिवसांच्या प्रवासानंतर घरी पोहोचले, तर कोणाला वाटेतच प्राण सोडावे लागल्याच्या करुण कहाण्या समोर आल्या आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *