रेल्वे च्या फ्री वाय फायचा उपयोग करून हमालाने पास केली आयोगाची परीक्षा.

नमस्कार मित्रांनो चांदा टू बांदा या साइट च्या माध्यमातून रोज नव नवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहचवत असतो. नियमित नव नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या साइटला भेट द्या. व आमच्या फेसबूक पेजला लाइक करा.
आजच्या युगात इंटरनेट ला अनन्या साधारण महत्व प्राप्त झाले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आज प्रत्येक विविध माहिती एका क्लिक मध्ये मिळवू शकते. याचीच प्रचिती केरळमधील एरणाकुलम रेल्वे स्टेशन वर काम करणार्‍या हमालाच्या जीवनात आला. सरकारी नौकारी मिळवण्याच्या त्याच्या प्रयत्नांना रेल्वे विभागाकडून दिलेल्या फ्री वाय फाय चा उपयोग करून त्याने चक्क केरळ लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली. केरळ मधील मुन्नार येथील श्रीनाथ हे गेल्या ५ वर्षापासून एरणाकुलम रेल्वे स्टेशन वर हमाली चे काम करत होते. रेल्वे स्टेशन वर हमालीचे काम करणारे श्रीनाथ आपल्या जीवनात काही वेगळं करण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत होते, त्यांच्या ह्या प्रयत्नांना रेल्वे च्या मोफत वायफाय मुळे पंख मिळाले. व आज त्यांना सरकारी नौकारी मिळाली. त्यांनी केलेल्या संघर्षाचे ज्यांनी प्रत्यक्षात अनुभव घेतले आहे ते आज श्रीनाथचे खूप कौतुक करत आहे. श्रीनाथ सोबत काम करणारे त्याचे सहकारी त्याला मिळालेल्या या यशाबद्दल खूप खुश असून त्यांनी रेल्वेमध्ये झालेल्या विविध बदलाबद्दल रेल्वे प्रशासनाचे कौतुक केले आहे.
मित्रांनो तुम्ही सुदधा आपले प्रयत्न सतत चालू ठेवा ज्यामुळे तुम्हाला ही हमखास यश मिळेल यशाची पायरी चढत असतांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. केरळमधील श्रीनाथ ची ही कहाणी नक्कीच खूप प्रेरणादायी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *