राम मंदिरासाठी शिवसेनेकडून १ कोटी रुपये,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अयोध्येत घोषणा.

महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या शिवसैनिकसह अयोध्येत दाखल झाले असून त्यांनी राम मंदिराच्या उभारणी साठी १ कोटी रूपयांचा निधि देण्याची घोषणा केली आहे. त्याच बरोबर अयोध्येत महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणात रामभक्त येतात त्यांच्यासाठी महाराष्ट्र भवन बांधण्याचा आपला मानस असून त्यासंबंधी आपण योगी आदित्यनाथ सरकारशी बोलणार असल्याचेही त्यांनी त्यांनी अयोध्या येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. राम मंदिर व्हावं ही सेनेची भूमिका पाहिलेपासूनच आहे. अयोध्येत नियमित येत राहणार यापूर्वीही आलो आणि यानंतरही येत राहणार असेही त्यांनी यावेळी सांगितले.
करोना वायरसच्या पार्श्वभूमीवर दौर्यातत नियोजित असलेल्या शरयू नदीवर महाआरती करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही भाजपापासून वेगळे अहो, हिंदुत्वापासून नाही.  

‘भाजपा म्हणजे हिंदुत्व असा अर्थ नाही. आम्ही भाजपापासून वेगळे झालो अहो हिंदुत्वापासून नाही.’ असा टोला त्यांनी भाजपला लगावला. महाविकास आघाडीचे शंभर दिवस पूर्ण केल्याच्या निमित्याने ते बोलत होते. त्यांचा मुलगा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे देखील त्यांच्या सोबत होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *