रात्रीच्या अंधारातून मजूर करत आहे स्थलांतर.

सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे परराज्यातील मजूर जिथे आहे तेथेच अडकून आहे. आपल्या गावाकडे जाण्याची व्यवस्था नसल्यामुळे मजूर कित्येक मजूर चालत आपल्या गावाकडे जात असल्याचे दिसून येत आहे.

अशीच घटना आज सकाळी गडचांदुर मध्ये काही युवकांच्या निदर्शनात आली आहे. आज सकाळी 5:30 च्या दरम्यान गडचांदूर येथे जवळ पास 25-30 मजूर आंध्रप्रदेश वरुण गडचांदूर ला आलेले बघायला मिळाले. सदर लोकाना विचारना केली असता ते लखमापुर ला जात असल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार समोर येताच वैभव राव यांनी तात्काळ नगर परिषद प्रशासनाला कळविले व कारवाही करण्याचीची मागणी केली.  जिल्ह्यात एकही पॉज़िटिव रुग्ण नाही अश्या परिस्थितीत जिल्ह्याच्या सीमा कडक असायला हव्या. कारण अशा प्रकारे जिल्ह्यात बाहेरील लोक आले तर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ शकतो व जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या एवढ्या दिवसांच्या प्रयत्नांवर पाणी फेरेल जाईल.  त्यामुळे या लोकांची कोरोना टेस्ट करून त्यांना क्वारंटाईन करण्यात यावे अशी मागणी वैभव राव यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *