राज्य सरकार १०० यूनिट वीज मोफत देण्याच्या तयारीत ?

प्रतींनिधी, मुंबई
(चांदा टू बांदा )
राज्यातील महावितरणच्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठी बातमी असून राज्य सरकार लवकरच १०० यूनिट पर्यंतची वीज मोफत देण्याच्या तयारीत आहे. याबाबतचे धोरण लवकरच अमलात आणण्यात येईल, घरघुती वीज वापरणार्‍या  ग्राहकांना ग्राहकांना मोफत बिल देण्यासाठी एक समिति अभ्यास करून समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी काल विधानपरिषदेत सांगितले आहे.

राज्यात वीज पुरवठा व वितरण करतांना खूप गळती होत असून ही गळती थांबवून विजेची तूट कमी करण्यात येईल व तूट कमी झाल्यास वीज कमी दरात देण्याचा आमचा मानस आहे असे त्यांनी एका लक्षवेधी सूचनेस उत्तर देतांना स्पष्ट केले. सामान्यांना वीज रास्त दरात देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तीन महिन्यात वीज मोफत देण्याच्या संबंधी समिति अहवाल सादर केल्यानंतर घरघुती ग्राहकांना १०० यूनिट पर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेणार आहे, तसेच शेतकर्‍यांना दिवस-रात्र वीज उपलब्ध करून देण्याबाबत धोरण आखण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक टेलीग्राम ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *