राज्यात स्वतंत्र ओबीसींची जनगणना होण्याचे संकेत ? सर्व पक्ष्यांमध्ये एकमत.

गेल्या काही दिवसांपासून स्वतंत्र ओबीसीची जनगणना व्हावी ही मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज विधानसभेत ओबीसींच्या जनगणनेवर चर्चा झाली. यावेळी कॅबिनेट मंत्री छगन भूजबळ यांनी राज्यात ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी अशी मागणी केली.यावर विरोधीपक्षाने सुद्धा समर्थन केले. त्यामुळे आता राज्यात ओबीसींची स्वतंत्र जनगणना होण्याचे संकेत दिसून येत आहे.

जनगणनेवर बोलतांना भूजबळ म्हणाले की, १९९० पासून ओबीसी समाजाच्या जनगणनेची मागणी होत आहे. परंतु ती मागणी प्रलंबित आहे. देशात ५४% ओबीसींची संख्या आहे. त्यामुळे ओबीसींची जनगणना स्वतंत्र होणे आवश्यक आहे. पंतप्रधानांना जात नसते, परंतु नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे आहे असेही ते म्हणाले. छगन भूजबळ यांनी केलेली मागणी ही योग्य आहे. ओबीसी च्या जनगणनेला आमचं समर्थन आहे. हा धोरणात्मक निर्णय आहे. योगायोगाने पंतप्रधान ओबीसी असल्यामुळे आपण सर्वांनी मिळून पंतप्रधानाकडे जाऊन जातनिहाय जनगणनेची मागणी करू असे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे आता ओबीसींची स्वतंत्र जनगणना होण्याचे संकेत दिसून येत आहे.

One Comment on “राज्यात स्वतंत्र ओबीसींची जनगणना होण्याचे संकेत ? सर्व पक्ष्यांमध्ये एकमत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *