राज्यात बोगस बियान्यांबाबत तब्बल ४० हजार तक्रारी

राज्यात बोगस बियान्यांबाबत तब्बल ४० हजार तक्रारी आल्या असून या सर्व तक्रारींची तपासणी केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कृषी वैज्ञानिक आणि कृषी विभागाची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचा अहवाल येणे बाकी असून साधारणतः १०  ते १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. महाबीज बियाणे संदर्भात ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्या शेतकऱ्यांना महाबीजचे बियाणे बदलवून देण्यात येत आहे. त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

कोरोनाचे संकट संपूर्ण राज्यावर असतांनाच अन्नदात्या शेतकर्‍यांवर बोगस बियाणांमुळे पुन्हा अडचणी वाढ झाली आहे. ऐन पेरणीच्या काळात बोगस बियाणे मिळाल्याने शेतकर्‍यांवर दुबार पेरणीची वेळ आली. कोरोनाच्या संकटामुळे आधीच खचलेला शेतकरी पुन्हा बोगस बियाणांमुळे पुन्हा संकटात सापडला आहे. 

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत २ लाखाच्या आत कर्ज असणाऱ्या सुमारे ३० लाख शेतकऱ्यांपैकी १९ लाख शेतकऱ्यांना १२ हजार कोटी रुपये खात्यात जमा करण्यात आले असून लॉकडाऊन मुळे ११ लाख शेतकऱ्यांना दिली जाणारी राज्य शासनाची कर्जमाफी अडली आहे. लॉकडाऊनची परिस्थिती सामान्य झाल्यास ११ लाख शेतकऱ्यांना तब्बल ८ ते ९ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल, अशी माहितीही कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज नागपूर दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *