राज्यात काल सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळल्याची नोंद.

राज्यातील कोरोनाचा आकडा सतत वाढत असून एका दिवशी सर्वाधिक रुग्ण आढळल्याचे काल दिसून आले. काल एका दिवशी राज्यात तब्बल २३४७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा एका दिवशी सापडलेल्या रुग्णांचा सर्वाधिक आकडा आहे.

त्यात एक दिलासादायक बाब म्हणजे काल एका दिवशी ६०० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहे. तर ६३ जणांचा काल कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील ३८, पुण्यात ९, औरंगाबाद शहरात ६, सोलापूरमध्ये ३, रायगडमध्ये ३ आणि ठाणे जिल्ह्यात ९, पनवेल शहरात १, लातूरमध्ये १, तसेच अमरावती शहरात एकाचा कोरोनाने बळी घेतला. आतापर्यंतच ७ हजार ६८८ जणांनी यशस्वीरित्या कोरोनाला हरवलं आहे. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *