राज्यात काल एका दिवशी सापडले सर्वाधिक कोरोना रुग्ण.

राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत वाढत असून काल राज्यात एका दिवशी ५०२४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दीड लाखाच्या पार गेली आहे. यापैकी ७९,८१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

आज एकूण २ हजार ३६२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ५२.२५ टक्के एवढं आहे. राज्यात आज १७५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६५८२९ रुग्णांवर उपचार चालू आहे.  कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्या झपाट्याने वाढत आहे.

राज्यात १० वर्षाखालील तब्बल ५ हजारापेक्षा जास्त मुलांना कोरोनाची लागण

५१०३ मुलांना कोरोनाची लागण झाली असून
राज्यात १० वर्षाखालील मुलांचे प्रमाण एकूण कोरोना बाधीत रुग्णांच्या ३.५८ टक्के आहे. २४ मेला राज्यात सर्वाधिक लहान कोरोनाबाधीत आढळली. या दिवशी १६८६ मुलांना कोरोना झाला असल्याचे निष्पन्न झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *