राज्यातील लॉकडाउनचे नियम शिथिल होणार नाही, ३ मे पर्यंत दुकाने बंदच. : आरोग्यमंत्री राजेश टोपे

महाराष्ट्रात ३ मेपर्यंत कोणतीही दुकाने सुरु होणार नाहीत असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. केंद्र सरकारने काल रात्री उशिरा काही निर्देश दिले असून ज्यानुसार काही दुकानांना, व्यवहारांना केंद्र सरकारने संमती दिली आहे. मात्र जोपर्यंत राज्य शासन यामध्ये निर्णय घेत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात दुकाने सुरु करण्याचा काही प्रश्नच येत नाही. काल रात्री केंद्राने काही निर्णय घेतले असून अद्याप राज्य सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी लॉकडाऊनचे निर्बंधांबाबत मोठा खुलासा केला आहे. राज्यात 3 मेपर्यत लॉकडाऊनच्या नियमावलीत कोणतेही बदल करण्यात येणार नाही, अर्थात कोणतेही निर्बंध शिथिल होणार नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

लॉकडाउनमुळे परराज्यातील बहुतेक मजूर महाराष्ट्रात अडकून आहे. त्यांना पाठविण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे केली होती. त्याचा पार्श्वभूमीवर जर केंद्राने परवानगी दिली तर परराज्यातील ७ लाख मजुरांना सोशल डिस्टसिंग राखून त्यांच्या राज्यात पाठविण्याची तयारी केल्याची माहिती देखील यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

राज्यात अजूनही कोरोनाग्रस्तांची संख्या कमी व्हायचं नाव घेत नाही आहे. त्याच पार्श्वभूमीवर हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी संचारबंदी शिथिल करण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील दुकानं उघडण्याची तुर्तास शक्यता नाही. मात्र, ग्रीन झोन असलेल्या ठिकाणी पूर्णपणे सीमा बंद करुन काही महत्वाच्या व्यवहारांना परवानगी देण्याची शक्यता असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

अबब..! ज्वेलर्समध्ये चोरी करण्यासाठी चोरट्यांनी खोदले ‘भुयार’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *