राज्यातील पुन्हा एक मंत्री झाले कोरोनाबाधित.

राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण हे राज्यातील सरकारची चिंता वाढवत असतांनाच सरकार मधील कार्य करणाऱ्या मंत्र्यांना देखील कोरोनाची लागण होते आहे. महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला आणि राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाला हजर होते. त्यामुळे मंत्रिमंडळातील आणि विशेषतः राष्ट्रवादीतील काही नेत्यांना संसर्गचा धोका निर्माण झाला आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही ठिकाणी कार्यक्रमात सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. तरीही कोणालाही लक्षणे आढळल्यास त्वरीत कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांचा समावेश आहे. मुंडे यांच्यासह या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत. काल रात्री त्यांच्या कोरोना टेस्टचे अहवाल आले. धनंजय मुंडे यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करणार आहोत. ते फायटर आहेत ते परत कमबॅक करतील, असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला.

या आधीही राज्यातील दोन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण या दोन्ही मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी यशस्वी कोरोनावर मात देखील केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *