राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची वाढतेय संख्या.

कोरोनाचा प्रादुर्भाव जाऊ नये म्हणून दिवसरात्र पोलिस आपले कर्तव्य बजावत आहे. आपला जीव धोक्यात घालून पोलिस मेहनत घेत आहे. मात्र आपले कर्तव्य बजावत असतांना त्यांनाही आता कोरोनाची लागण होत आहे. राज्यात आज एका दिवशी तब्बल ७९ पोलिसांना कोरोना झाला आहे. राज्यात आतापर्यंत ११४० पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून १२ पोलिसांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या अतिरिक्त पाळया लागत असल्याने याचा परिणाम देखील पोलिसांच्या आरोग्यावर होत आहे.

पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनेत वाढ

लॉकडाऊनदरम्यान पोलिसांवर हल्ल्याच्या घटनेत वाढ होत आहे. राज्यात आतापर्यंत २३१ ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले आहेत. याप्रकरणी ८१२ हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. राज्यात काल पोलिसांवर हल्ल्याच्या ४ घटना घडल्या. आतापर्यंतच्या हल्ल्यात ८५ पोलीस कर्मचारी आणि एक होमगार्ड गंभीर जखमी झाले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *