राज्याचा महसूल घटला, अर्थव्यवस्थेतसोबतच मेघाभरतीवर होणार परिणाम.

कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन चालु असून राज्यातील सर्व उद्योग बंद आहे. राज्याला मिळणारा महसूल जवळपास बंद झाला असून याचा परिणाम आता राज्यात होणाऱ्या विविध पदांसाठी होणाऱ्या मेगाभरतीवर होण्याचे चिन्ह दिसून येत आहे. महसुलात घट झाल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे, राज्य सरकारने आता कठोर उपापयोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग वगळता इतर विभागांच्या नव्या भरतीवर बंदी घालण्यात आली.

आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य वगळता इतर सर्व विभागाच्या सर्व भरत्या रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे इतर विभागांमध्ये पुढील सूचना मिळेपर्यंत कोणतीही भरती होणार नाही. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांतील उपाययोजनांमध्ये सातत्य राखणे गरजेचं अहे. ही बाब लक्षात घेऊन चालू वित्तीय वर्षात कोणत्याही विभागातील अधिकारी/कर्मचारी यांची बदली करण्यात येऊ नये. असे आदेश सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात येत आहे. नवीन भरत्यावर खर्च करू नये अश्या सूचना देण्यात आल्या आहे. ज्या नवीन योजना समोर ढगलण्यासारख्या आहे. त्या स्थगित करण्याच्या सुचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहे. तसेच चालू वर्षात नवीन योजना प्रस्तावित करू नये असेही सुचविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *